Saturday, 2 May 2020

ऐक निर्माण झालेला प्रश्न ? की शिकवण


   
                      आज माझी पहिलीच वेळ अशी काहीतरी लिहायची , आज रोजी जवळपास ४० दिवस पूर्ण होतील ह्या लॉक डाउन ला माझ्या सारखेच तुम्ही सुद्धा आता कंटाळून गेला असाल ,ह्याच  रोजच्या त्याच रुटीन ला , ज्यादिवशी जाहीर झालं की आता २१ दिवस आपला पूर्ण भारत देश बंद असणारे , तेव्हा वाटलं की हा चांगला निर्णय आहे. २२ व्या दिवशी सगळं निट असेल. पण आता जवळपास १ महिन्याच्या वर दिवस झालें पण परिस्तिथी अजूनही तशीच आहे, आता नवीन काहीतरी करूया ह्या २१ दिवसात असा म्हणणारा मी , मला आता काळजी वाटु लागलीये , कधी थांबेल हे सगळं आणि थांबलं नाहीच तर , असे कित्येक प्रश्न मनात येतायत ,पण उत्तर मात्र सापडत नाहीये .

                       माझ्यासारखेच तुम्हालाही काही प्रश्न पडले असतील , काहींना वाटत असेल माझ्या नोकरी च काय होईल, तर काहींना आपला व्यवसाय सुरू होईल का नाही ,आणि झालाच तर पूर्वी सारख सगळं व्यवस्थित होईल की नाही ,आणि होउपर्यंत मी टिकू शकेन का , गृहिणी ना वाटत असेल की घर कस चालवायचं , मोठ्या उद्योगपतीं ना उद्योग सुरु करण्याचे प्रश्न , मजुरांना काम मिळण्याचा प्रश्न, असे बरेंच प्रश्न न सगळ्यांनाच पडतील , असो ह्या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच वेळ आल्यावर, पण ह्या महामारीतून ऐक शिकवण मात्र नक्की मिळाली की आपण कितीही नियोजन करू , पूर्वनियोजित राहू पण ह्या निसर्गापुढे आपण शून्य आहोत. म्हणून  इथून पुढे मी असा मी हा आहे ,हे सगळं सोडून आपण म्हणून जगुयात  , स्वताप्रमाणे निसर्गाची सुद्धा काळजी घेऊ , आपल्या कुटुंप्रमाणेच हा निसर्ग आपल्याच कुटुंबातील ऐक सदस्य आहे , असा समजु आनी येणाऱ्या नविन पर्वाची सुरवात करु .